कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत जिल्ह्यातील तालुकास्तरीय विजेता संघांनी व खेळाडूंनी सहभाग घेतला
सदर स्पर्धेचे उद्घाटन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे करण्यात आले या कार्यक्रमासाठी शालेय समिती चेअरमन आर.एच. सावंत,सदस्य तुषार सावंत व पदाधिकारी,पंढरीनाथ चव्हाण,क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (कनिष्ठ लिपिक),प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण (कणकवली तालुका क्रीडा समन्वयक, क्रीडाशिक्षक), प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडू ,प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होतेतसेच या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नामांकित पंच म्हणून श्रीकृष्ण आडेलकर, देवेंद्र सावंत अजित देठे,श्री. पेडणेकर पंच म्हणून लाभले
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करून पी.एन.मसुरकर (सहा.शिक्षक माध्यमिक) यांनी आभार प्रदर्शन केले.











