वत्सला प्रतिष्ठान कणकवलीचा लोकसाहित्य पुरस्कार गोव्यातील पौर्णिमा राजेंद्र केरकर यांना जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : गोव्यातील लेखिका कवयित्री व लोक साहित्याच्या अभ्यासक पोर्णिमा राजेंद्र केरकर यांना कणकवली,महाराष्ट्र येथील वत्सला प्रतिष्ठांनचा पहिला दौपदी कुंभार लोकसाहित्य पुरस्कार नुकताच वत्सला प्रतिष्ठानचे कार्यवाह कवी मोहन कुंभार यांनी प्रतिष्ठानच्या वतीने जाहिर केला आहे. पोर्णिमा राजेंद्र केरकर या शिक्षिका असून अनेक वर्षांपासून साहित्य, कला,लोकसाहित्य, समाज या क्षेत्राशी जोडल्या गेल्या आहेत. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असतानाच त्यानी कविता लेखनही केले आहे. कृषीजन संस्कृतीशी निगडित असणाऱ्या लोककला, लोकपरंपरा,सांस्कृतिक ठेवा कालबाह्य व नष्ट होत आहे. पुढच्या काही काळानंतर या सर्व गोष्टी ऐतिहासिक होण्याच्या मार्गावर आहेत. अशा काळात कृषी संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या वस्तू, कला, परंपरा, रितीरिवाज,संस्कृती यावर अभ्यास करून लेखी स्वरूपात त्यांचे जतन करण्याचे काम पौर्णिमा केरकर करत आहेत.

गोवा आणि गोवा राज्याबाहेरील अनेक संस्थांवर त्या सध्या कार्यरत आहेत. या संदर्भातले अनेक संस्थांचे महत्वाचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन अशा माध्यमातून त्यांनी अनेक गोमंतकीय कलावंतांना वाव दिला. त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिले. लोकसाहित्याकडे वळण्यासाठी एक दिशा त्यांनी ठरवून दिली. गोव्यातील धालोत्सव, फुगड्या, गीते, अशा अनेक गोष्टींचा शोध घेऊन ते जतन करण्याचे काम पोर्णिमा केरकर करत आहेत.

१) स्पंदन -(काव्यसंग्रह ) २)अनुबंध लोकगंगेचे-(लोकसाहित्यावर शोधनात्मक लेख) ३)गोव्यातील धालोत्सवाचे स्वरूप-(गोमंतकीय पारंपरिक लोकनृत्य ‘धालो ‘ वरील संशोधनात्मक पुस्तक ) ४)विस्मृतीच्या उंबरठ्यावर -(लोकपरंपरेतील हरवत चाललेल्या वस्तुसंस्कृतीवरील सचित्र पुस्तक;अशी त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. विस्मृतीच्या उंबरठ्यावर पुस्तकाचा हिंदीत अनुवाद प्रकाशित झालेला असून ,इंग्रजी पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे, गोवा हिंदू असोसिएशन मुंबईंचा बा. भ.बोरकर पुरस्कार , *Sanctury Asia चा Green Teacher हा उभयतांना पर्यावरण आणि सामाजिक कार्यासाठी मिळालेला प्रतिषठेचा पुरस्कार, बिल्वद्ल, साखळी या संस्थेचा साहित्यासाठी पंडीत महादेव जास्त्री जोशी पुरस्कार, सामाजिक कार्यासाठी गोवा राज्याच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती जशशिकलाताई काकोडकर पुरस्कार, स्टार प्रवाह वहिनी, मुंबई चा सिटी रत्न पुरस्कार “सामाजिक कार्यासाठीचा’ ऑर्किड” पुरस्कार असे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

विद्यार्थी दशेपासून साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्याचा वावर आहे. “गोमंतक मराठी अकादमी” आयोजीत युवा साहित्य संमेलन, साखळी, बिल्वद्ल संस्थेचे सत्तरी साहित्य संमेलन, महिला संमेलन, बेळगाव, कर्नाटक येथील “मंथन”च्या २८ साव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, “प्रेरणा साहित्य संमेलन, शिरोडा, वेगुर्ला महाराष्ट्र, अध्यक्षपद- इत्यादी अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदं त्यांनी भूषविलेली आहेत . विविध कविसंमेलने,चर्चासत्रे, परिसंवाद यामध्येही त्यांचा मोठा सहभाग आहे. अशा या चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या पौर्णिमा केरकर यांना जाहीर झालेला हा वत्सला प्रतिष्ठान,कणकवलीचा पुरस्कार शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी कणकवली येथे संध्याकाळी 4.00 वाजता संगीता मोहन कुंभार यांच्या वरवडे फणसवाडी येथील निवासस्थानी सन्मानपूर्वक प्रदान केला जाईल यावेळीसिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर, डॉ. गोविंद काजरेकर, वीरधवल परब,रश्मी कशेळकर, कल्पना मलये आदि साहित्यिक व चित्रकार नामानंद मोडक उपस्थित राहणार आहेत. असे प्रतिष्ठानचे कार्यवाह मोहन कुंभार यांनी प्रसिद्ध केले आहे. या पुरस्कारासोबतच स्थानिक कलावंत मेस्त्री यांनाही कला जतनासाठिचा द्रौपदी कुंभार लोकसाहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्राचार्य गोविंद गाजरेकर, कवी विरधवल परब, रश्मी कशेळकर व कल्पना मलये यांच्या निवड समितीने या पुरस्कारार्थीची निवड केली आहे.

error: Content is protected !!