कणकवलीत सकल हिंदु समाजाने जाळला पाकिस्तानी ध्वज

कणकवली (प्रतिनिधी) : पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी हल्ला केला. यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. शुक्रवारी येथील पटवर्धन चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करताना पाकिस्तानचा ध्वज तुडवून जाळण्यात आला. तसेच पाकिस्तानविरोधी घोषणाही उपस्थित देशप्रेमी कार्यकर्ते आणि नागरिकांनी दिल्या.

या आंदोलनात बजरंगदल रत्नागिरी सिंधुदुर्गचे विभाग संयोजक दत्तप्रसाद ठाकूर, तालुका संयोजक नागेश मोगवीरा, सहसंयोजक दिनेश सरुडकर, अखिल आजगावकर, मकरंद सावंत, विश्व हिंदू परिषदेचे तालुका प्रमुख सुनील सावंत, नंदकुमार आरोलकर, राष्ट्र सेविका समितीच्या प्रतिभा करंबेळकर, मृणाल ठाकूर, सुरेखा महाजन, भारतीय मजदूर संघचे भगवान साटम यांच्यासह शेखर गडेकर, नरोत्तमभाई पटेल, पंडित करंबेळकर, नायगावकर सर, अमित मयेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!