फोंडाघाट(प्रतिनिधी) : लोरे गावचे जेष्ठ नागरिक, माजी सरपंच ,लोरे विकास संस्थेचे माजी चेअरमन, वाघेरी- लोरे हायस्कूलचे संस्थापक संचालक, गाव पातळीवर सामाजिक आणि धार्मिक कामात योगदान देऊन सदैव अग्रेसर असणारे, गुरव समाजातील आदर्श व्यक्तिमत्व- महादेव तुकाराम गुरव तथा आप्पा (८४वर्षे) यांचे काल त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पश्च्यात मुले – मुली असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाबद्दल गावात सर्व स्तरावर शोक व्यक्त होत आहे.












