सरकारमध्ये एक फूल दोन हाफ, त्यांनाआंदोलन सुरु असल्याची माहिती नव्हती का ?

ब्युरो न्युज (मुंबई) : जालन्यात काल मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या या अमानुष आणि बेछुट गोळीबारामुळे मराठा समाज चांगलाच खवळला आहे. या लाठीहल्ल्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. आज राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने केली जात असून काही ठिकाणी बंदही पुकारण्यात आला आहे. विरोधकांनी या हल्ल्यावरून भाजपला चांगलंच घेरलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या हल्ल्याचा निषेध करत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात एक फूल दोन हाफ आहेत. त्यांना आंदोलनाची माहिती नव्हती काय? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. सरकारमध्ये एक फूल दोन हाफ आहेत. या एक फूल दोन हाफला आंदोलन सुरु असल्याची माहिती नव्हती का? मी मुख्यमंत्री असताना रोज कुठे काय सुरू आहे याची माहिती मला दिली जायची. गृहमंत्र्यांना तर अशा आंदोलनाची माहिती असतेच असते. मग यांना माहीत नव्हती काय? असा सवाल करतानाच जालन्यात कार्यक्रम घ्यायचा होता म्हणून मराठा आरक्षण मोडीत काढल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.बारसूतही असाच लाठीमार झाला होता. त्यावेळी मी बारसूला गेलो होतो. आंदोलकांची भेट घेतली होती. जालन्यात आंदोलकांवर लाठी हल्ला झाला. पण यांचा एक मंत्रीही तिकडे फिरकला नाही. पोलीस तुमच्या घरी आम्ही तुमच्या दारी, असा प्रकार राज्यात सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

error: Content is protected !!