खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शालेय विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी नुकतेच शाळा स्तरावरील तृणधान्य पाक कलाकृती स्पर्धेचे आयोजन केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रियंका स्वप्नील गुरव,द्वितीय क्रमांक श्रद्धा शिवाजी पाटील तर तृतीय क्रमांक सारिका आनंद चौरे या महिला पालकांनी पटकाविले. या स्पर्धेचे उद्घघाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.या कार्यक्रमाला पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव,खारेपाटण ग्रा.प.सदस्य गुरूप्रसाद शिंदे, मनोज करंदीकर, संध्या पोरे,सिन्दुर लावेकर आदी मान्यवर उपस्थित होते.तर या स्पर्धेला खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर व गौरी शिंदे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेचे परीक्षण खारेपाटण प्रा आ.केंद्र वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रिया वडाम व डॉ.सचिन पारकर यांनी केले.महिलांनी तृणधान्य पासून बनविलेले सर्व पदार्थ हे उत्तम दर्जाचे व आरोग्याला पोषक असे असल्याचे यावेळी परीक्षकांनी सांगितले. खारेपाटण केंद्र शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या तृणधान्य पाककला स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका स्मिता कोरगावकर यांच्या वतीने प्रमाणपत्र भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आली.यातील प्रथम क्रमांक विजेता स्पर्धकाची निवड पुढे होणाऱ्या केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.तर या स्पर्धेतील पदार्थ विद्यार्थी व पालकांसाठी प्रदर्शन करून मांडण्यात आले होते.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक कोंडविलकर सर,श्रीम.रेखा लांघी,रुपाली पारकर,अलका मोरे,आरती जेजोन अमृता ब्रम्हदंडे,श्रीम.काझी मॅडम यांनी सहकार्य केले.
खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत तृणधान्य पाक कलाकृती स्पर्धा संपन्न












