चौके ( अमोल गोसावी ) : चौके येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौके नं.१ या शाळेत रानभाज्या पाककला उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी इयत्ता १ ली ते ४ थी च्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या बनवून आणून सुंदर मांडणी केली होती. या भाज्याची नावे त्यांचे फायदे व कश्याप्रकारे बनविण्यात आले याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. शालेय जीवनात मुलांना रानभाज्यांची माहिती व्हावी व या भाज्या आपल्या दैनंदिन आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे कळावे यासाठी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिया जाधव,रमाकांत सोनसुरकर सर, स्मिता जाधव अंगणवाडी सेविका सांडव, संघर्ष महिला बचत गटाच्या निरा सावंत तसेच पालक उपस्थित होते.