चौके अंगणवाडी बीट नं.१ येथे पोषण अभियान अंतर्गत पाककला स्पर्धा

चौके ( अमोल गोसावी ) : चौके अंगणवाडी येथे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रीय पोषण अभियान व पोषण महा या उपक्रमांतर्गत गरोदर माता मार्गदर्शन, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, पाककला स्पर्धा या सारखे विविध उपक्रम आरोग्य केंद्अंतर्गत राबविण्यात येणार आहेत. यामध्ये पाककला स्पर्धेत रानभाज्या, मोड आलेले कडधान्य, नाचणी यापासून महिला पालकांनी पौष्टिक आहार बनविला.या उपक्रमासाठी त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अंगणवाडी सेविका सौ.भारती सांडव , मदतनीस सौ. चौकेकर,डॉ. चैताली ढोले, आरोग्य सेवक श्री.आनंद वाईरकर, आरोग्यसेविका सौ.माणगांवकर, आशा स्वयंमसेविका सिध्दाली गावडे,अनिता चौकेकर, महिला पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!