दहशतवादी हल्ल्याचे निषेधार्थ ‘आप’ चे जोडे मारो
कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे उप अधीक्षक (डीएसपी) शहीद झाले. या भ्याड हल्ल्यावर देशभरातून रोष व्यक्त होत आहे. तीन वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला काश्मीर येथे घडला. या हल्ल्याच्या विरोधात आम आदमी पार्टीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळा/बॅनर ला जोडे मारून निषेध व्यक्त केला. छ. शिवाजी चौक येथे जमून पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दहशतवादाला पोसणाऱ्या ‘पाकिस्तानचा धिक्कार असो’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा लगावण्यात आल्या. पाकिस्तानाने अशा दहशतवाद्यांनी त्वरित वेसन घालून हल्ले थांबवावेत अन्यथा 1971 व कारगिल मध्ये जे झाले त्यापेक्षा मोठ्या नामुष्कीला त्यांना जावे लागेल अशी टीका आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, किरण साळोखे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, विजय हेगडे, संजय नलवडे, पूजा अडदांडे, समीर लतीफ, शशांक लोखंडे, सदाशिव कोकितकर, मयूर भोसले, प्रथमेश सूर्यवंशी, नाझील शेख, चेतन चौगुले, लाला बिर्जे, महेश घोलपे, मनोहर नाटकर, आदी उपस्थित होते.