आचरा (प्रतिनिधी): वायंगणी येथील ज्ञानदीप संस्थेचे माजी अध्यक्ष व प्रगतशिल शेतकरी अरुण गजानन कांबळी रा.कालावल वय 80 यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.ते मधू दंडवते यांचे सहकारी म्हणून ओळखले जात शेती मधिल नाविन्यातून त्यांना राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला होता. कालवलच्या विकासात अरूण कांबळी यांचा मोठा सहभाग होता. कालावल शाळा ते रस्ते अन्य विकासात त्यांचे योगदान फार मोठे होते. ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य, अध्यक्ष अशी त्यांनी पदे भूषविली होती. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे सूना नातवंडे असा परीवार आहे.