तारी बंधूंना मारहाण प्रकरणी आरोपी संदीप गुंडलापल्ली चा अटकपूर्व जामीन फेटाळला

अटकेची कारवाई टाळण्यासाठी हायकोर्टात घ्यावी लागणार धाव

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील मणचे येथील विवेक तारी व रामदास तारी यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी संदीप आनंद गुंडलापल्ली, रा. सायन – मुंबई याचा अटकपूर्व जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील गजानन तोडकरी व यांनी काम पाहिले. विवेक तारी (४८) हे आपला व भाऊ रामदास याच्यासोबत १० जून २०२३ रोजी आपल्या पाळेकरवाडी ह येथील कलम बागेत गेले होते. तेथून ६ परत घरी जात असताना मणचे जुनी अ गोठन येथील रस्त्यावर नंबर प्लेट नसलेली इर्टिगा गाडी उभी होती. त्याला ती मागे घेण्यास सांगितली. मात्र ती मागे-पुढे करीत त्याने इको गाडीच्या समोर आडवी लावली व त्यातून तीन ते चार अनोळखी व्यक्ती बाहेर पडल्या व आपल्याला मारहाण केली. तसेच इको गाडीची चावी घेऊन मुटाटच्या दिशेने पळून गेले, अशी तक्रार विवेक तारी यांनी विजयदुर्ग पोलिसात दिली होती. फिर्यादीने वाहनाच्या दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी केलेल्या तपासात गुन्हयात वापरलेली इर्टिगा कार आंबेरी चेकपोस्टवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आली होती. एम. एच. ०१ सी. डब्ल्यू ६६२२ असा या वाहनाचा नंबर असल्याचे निष्पन्न झाले होते. कणकवली येथील एका लॉजवर संशयित आरोपी अन्य व्यक्तींसह राहिला होता. मात्र तपासात त्याने ही माहिती देण्याचे टाळले होते. त्यानंतर या वाहनाच्या मालक असलेल्या मुंबई येथील श्रद्धा बागवे यांचा मुलगा मोहक बागवे याने हे वाहन स्वत:हून पोलीस ठाण्यात जमा केले होते. तसेच संदीप आनंद गुंडलापल्ली, रा. सायन याने ती ८ जून रोजी मित्रांसोबत मुंबई येथून कणकवली येथे फिरण्यासाठी नेली होती, असा जबाब लिहून दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी संशयित आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. त्यावरील सुनावणीत तो फेटाळण्यात आला.

error: Content is protected !!