सदस्य व खारेपाटण महाविद्यालय एन एस एस विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग
खारेपाटण (प्रतिनिधी): “एक दिवस एक तास आपल्या गाव स्वच्छतेसाठी” या उपक्रमाअंतर्गत खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच रविवार दी.१ ऑक्टोंबर २०२३ रोजी खारेपाटण येथील ७२ खेड्याचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कालभैरव मंदिर परिसराची संपूर्ण साफ सफाई व स्वच्छता श्रमदानातून करण्यात आली.यावेळी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या खारेपाटण विभागातील श्री समर्थ बैठककितले सदस्य तसेच खारेपाटण महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या विद्यार्थ्यांनी या स्वच्छता मोहिमेत विशेष सहभाग घेतला होता. खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता उपक्रमाला खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा.पं. सदस्य जयदीप देसाई, शितीजा धुमाळे,दक्षता सुतार,अमिषा गुरव,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव,संतोष पाटणकर,ग्रामविकास अधिकारी जी सी वेंगुर्लेकर खारेपाटण महाविद्यालयाचे प्राध्यापक व एन एस एस विभागाचे प्रमुख वसीम सय्यद सर तसेच खारेपाटण येथील श्री समर्थ सदस्य बैठक प्रतिनिधी संतोष शिंदे पाटील आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एक दिवस एक तास गाव स्वच्छतेसाठी हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात आले असून या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत खारेपाटण च्या नियोजनाखाली खारेपाटण ग्रा.पं.चे सर्व सदस्य व कर्मचारी तसेच समर्थ सदस्य बैठक खारेपाटण विभाग येथील सुमारे ५० सदस्य तसेच खारेपाटण महाविद्यालयाचे एन एस एस विभागाचे २५ विद्यार्थी यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन श्रमदान करून खारेपाटण येथील श्री देव काल भैरव मंदिर परिसर स्वच्छ केला. खारेपाटण ग्रामपंचायतीने राबविलेल्या या स्वच्छता उपक्रमांचे श्री देव कालभैरव व दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपाटणचे अध्यक्ष मधुकरशेठ गुरव यांनी आभार मानले.व स्वच्छता उपक्रमास शुभेच्छा दिल्या.तर खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी प्रत्येक नागरिकानी जबाबदारी पूर्वक आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास संपूर्ण गाव स्वच्छ होईल.यासाठी शासनाच्या या उपक्रमास सर्वांनी सहकार्य करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.














