देवगड (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने चालवत असलेल्या ट्रक ( MH09GJ- 0566 ) वरील ताबा सुटून ट्रक रस्त्यालगत कलंडून अपघात घडला. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी देवगड निपाणी रोडवर शिरगाव धोपटेवाडी समर्थ नर्सरी नजीक वळणावर घडली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल वैजल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रक चालक स्वप्नील शिवाजी निंबाळकर ( वय 24, रा. शाहूनगर, निपाणी, ता चिकोडी, बेळगाव ) याच्यावर भरधाव वेगाने मानवी जीवनास हानी होईल अशा पद्धतीने बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी आयपीसी 279, मोटर व्हेईकल ऍक्ट 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव ट्रक चा शिरगाव मध्ये अपघात ; चालक स्वप्नील शिवाजी निंबाळकर वर गुन्हा दाखल











