शिवसेना नेते खा. विनायक राऊत उद्या वैभववाडी तालुका दौऱ्यावर

शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल वैभववाडीत खा.राऊत यांचा करण्यात येणार सत्कार

तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांना भेटी व ग्रामस्थांशी साधणार संवाद

वैभववाडी (प्रतिनिधी) :शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत शुक्रवार दि २० ऑक्टोबर रोजी वैभववाडी तालुका दौऱ्यावर आहेत.वैभववाडी येथे शिवसेना कार्यालयात सकाळी १०.३० वाजता खा .विनायक राऊत यांचा शिवसेना उ.बा.ठा यांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.  त्यानंतर खा.राऊत तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. तालुक्यातील नवरात्र उत्सवांना भेटी देऊन देवदर्शन घेणार आहेत.  त्यानंतर तालुक्यातील विविध मंदिरांना भेट देणार आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे..

सकाळी ११.३० वा जांभवडे महालक्ष्मी मंदिर, दुपारी १२.१५ वा. नेर्ले – श्री देव धावजी देवस्थान, दुपारी १.०० वाजता, आखवणे येथे कै. मानाजी गुरव यांच्या पुतळ्यास भेट, दुपारी १.३० वाजता, मौदे – श्री बावचा देवी मंदिर, दुपारी २.१५ वा.हेत केदारलिंग मंदिर, दुपारी ३.३० वा. भुईबावडा – रवळनाथ मंदिर येथे देवदर्शन, सायंकाळी ४.०० वा. तिरवडे तर्फे खारेपाटण येथे गांगो रवळनाथ मंदिर देवदर्शन, सायंकाळी ४.४५ वा. उंबर्डे येथे मेहबूबनगर शिवसेना शाखेला भेट व कार्यकर्त्यांशी चर्चा, सायंकाळी ५.३० वा. कोळपे येथे समाज मंदिरात ग्रामस्थांशी चर्चा,सायंकाळी ६.००वा. तिथवली येथे श्री देव गांगेश्वर मंदिर येथे भेट, सायंकाळी ७.०० वा. सोनाळी,पावणादेवी मंदिर, रात्री ७.३० वा. करूळ येथे श्री देव रवळनाथ दर्शन, रात्री ८.०० वा. वैभववाडी शहरातील देवींचे दर्शन, रात्री ८.३० वा., नाधवडे येथे देवी दर्शन,रात्री १० वा खांबाळे श्री आदीष्टी देवी, रात्री १०.३०ला श्री आचिर्णे रासाई, रात्री ११वा लोरे नं२ येथे ग्रामस्थांच्या भेट घेणार आहेत.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा संघटक सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, युवासेना जिल्हाचिटणीस स्वप्नील धुरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर, माजी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत . तरी तालुक्यातील शिवसेना, युवासेना , महिला आघाडी यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका प्रमुख मंगेश लोके व युवासेना तालुकाप्रमुख रोहीत पावसकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!