प्रियकराने मित्रांसह केला प्रेयसीवर बलात्कार 

दारूम च्या माळरानावर घडली घटना

कणकवली (प्रतिनिधी): प्रियकराने आपल्या दोन मित्रांसह स्वतःच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून याबाबत कणकवली तालुक्यातील दोन व  राजापूर तालुक्यातील एका युवकावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडितेच्या  प्रियकराने तिला आधी जबरदस्ती ने दारू पाजली . त्यांनतर स्वतः आणि त्याच्या दोन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना दारूम च्या माळरानावर 15 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर च्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली.  पीडित युवती ही कणकवली तालुक्यालगतच्या तालुक्यातील असून तळेरे येथे कामाला होती. याबाबत कणकवली तालुक्यातील दारूम , नादशिरवल आणि राजापूर तालुक्यातील केळवली गावातील युवकांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!