कणकवली (प्रतिनिधी): एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कणकवली येथील विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर आणि ए आय एम एल विभागातर्फे इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक 17 ऑक्टोबर व 18 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आले. या कार्यशाळेसाठी सॉफ्ट मस्क इन्फो प्रायव्हेट लिमिटेड बेळगाव या कंपनीमधून प्रमुख पाहुणे व वक्ते राजशेखर पाटील,अमृत सायनाकर, टेक्निकल असिस्टंट ऋषिकेश जिगजिंनी व मयुर कुलम हे उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी कॉम्पुटर, ए आय एम एल आणि मेकॅनिकल विभागातील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये आपल्या दैनंदिन जीवनातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये काही सेन्सर्स बसविलेले असतात आणि ती उपकरणे इंटरनेट ऑफ थिंग्स प्लॅटफॉर्मशी कनेक्ट केलेले असतात ही उपकरणे वेगवेगळ्या डिव्हायसेस मधील डेटा गोळा करतात आणि त्याचे विश्लेषण करून महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला गरज असेल तेव्हा एखाद्या एप्लीकेशन द्वारे देतात. तसेच या कार्यशाळेमध्ये दोन प्रोजेक्ट विद्यार्थ्यांच्या कडून विकसित करून घेण्यात आले.या कार्यशाळेचा फायदा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत व त्यासाठी एस एस पी एम महाविद्यालय नेहमी कटिबद्ध व अग्रेसर आहे. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सोमनाथ मेलसगरे यांनी केले. महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. एम के साटम ,प्रशासकीय अधिकारी शांतेश रावराणे,कम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. दर्शन म्हापसेकर ,ए आय एम एल विभाग प्रमुख प्रा.सुप्रिया नलावडे, महाविद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कणकवली येथे कॉम्प्युटर आणि ए आय एम एल या विभागातर्फे इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) या कार्यशाळेचे आयोजन
