वैभववाडी तालुका शिवसेना, युवासेनेच्या वतीने खा.विनायक राऊत यांचा सत्कार
वैभववाडी (प्रतिनिधी): कोणतेही राजकीय पाठबळनसताना आणि राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसनेचे विचार यामुळेच विविध पदे मिळत गेली जिल्ह्यात काम करताना तुमच्यासारखे जीवाभावाचे कार्यकर्ते लाभले हे माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी वैभववाडी येथे केले. खासदार विनायक राऊत यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल वैभववाडी तालुका शिवसेनेच्यावतीने आणि युवा सेनेच्या वतीने वैभववाडी शिवसेना शाखेत करण्यात आला सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संपर्कप्रमुख अतुल रावराणे , युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नंदु शिंदे,सरवणकर, रोहित पावसकर,स्वप्नील धुरी,दिगंबर पाटील,मनोज(बंड्या ) सावंत, शिवाजी राणे, लक्ष्मण रावराणे पदाधिकाऱी मोठ्या संख्येने उपस्थित होते