माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत “कवितांचा प्रवास “कार्यक्रम उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी,तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती १५ ऑक्टोबर निमित्त “कवितांचा प्रवास ” व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

भारताचे अकरावे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम हे थोर शास्त्रज्ञ,संशोधक, राजकारणी,लेखक होते. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे झाला. त्यांना वाचनाची व लेखनाची आवड होती, त्यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी भारतीय अंतरिक्ष संशोधनामध्ये मोलाचे योगदान दिल्यामुळे त्यांना मिसाईल मॅन या नावाने संबोधले जाते.

भारतीय संस्कृती ही एक प्राचीन संस्कृती आहे, आधुनिक युगामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी,भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन व वृद्धिंगत होण्यासाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर “वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा केला जातो. वाचनामुळे प्रत्येक व्यक्तीचे बौद्धिक ज्ञान व आकलन शक्ती वाढते, म्हणून पुस्तके ही आपली सोबती व मार्गदर्शक ठरतात. ग्रंथ हेच गुरु,वाचाल तर वाचाल अशा अनेक प्रकारे पुस्तके ही व्यक्तीला सुज्ञान नागरिक बनवण्यासाठी प्रोत्साहन व प्रेरणा देतात.

या वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्य साधत आधुनिक मराठी कविता वर आधारित “कवितांचा प्रवास” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जेष्ठ साहित्यिक व कवी डॉ.सुनील सावंत यांनी आधुनिक मराठी कविता १९ व्या शतकापासून आजपर्यंत कशी बदलत गेली व प्राचीन कविता बाराव्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत कशी बदलली याविषयी अभ्यासात्मक माहिती दिली, तसेच अनेक प्रतिष्ठित कवी कवयित्रींच्या कविता आणि त्यांच्या स्वतःच्या निवडक कविता त्यांनी सादर केल्या त्याच बरोबर ज्येष्ठ हिंदी साहित्यिक व कवी डॉ.बिरेंद्र प्रताप सिंह यांनी स्व लिखित नारीशक्ती वर आधारित कविता व मुंबई महानगर कहानी सादर केली तसेच प्रशालेतील काही निवडक विद्यार्थ्यांनी आपल्या स्व लिखित कवितांचे उत्तम प्रकारे सादरीकरण केले

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती कविवर्य डॉ. बिरेंद्र प्रताप सिंह (जेष्ठ हिंदी साहित्यिक), कविवर्य डॉ.सुनील सावंत (जेष्ठ मराठी साहित्यिक),चंद्रकांत दरेकर (मुंबई) तसेच या कार्यक्रमाचे कार्यक्रमाध्यक्ष आर.एच.सावंत, (शालेय समिती चेअरमन), शालेय समिती सदस्य अशोक सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी,पर्यवेक्षक बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर सर व आभार मृणाल साटम यांनी केले.

error: Content is protected !!