अनुभव शिक्षा केंद्र आणि पोंभुर्ले बौद्धजन उन्नती मंडळाचे सामाजिक पाऊल

धम्मचक्र प्रवर्तन आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर साऊ ज्योती वाचनालय सुरू

देवगड (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र आणि पोंभुर्ले बौद्धजन उन्नती मंडळ यांच्या मार्फत धम्मचक्र प्रवर्तन आणि दशहरा निमित्ताने दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी शाहू ज्योती वाचनालय सुरु करण्यात आले. यावेळी अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, कोलेज समन्वयक विशाल गुरव, साथी राहुल कांबळे ग्रांम. सदस्य मयुरी कांबळे, मंडळाचे अध्यक्ष सुधाकर कांबळे, आदर्श महिला मंडळ अध्यक्षा प्रज्ञा कांबळे, वासुदेव कांबळे -सचिवप्रकाश कांबळे – दुय्यम चिटणीस निलेश कांबळे – हि.तपासणीस, राजेंद्र कांबळे – खजिनदार, सुनिल कांबळे ,नारायण कांबळे प्रभाकर कांबळे ,विलास कांबळे – सल्लागार, सुरेश कांबळे – सल्लागार, माजी पोलीस पाटील विजय कांबळे किशोर कांबळे – सल्लागार उपस्थित होते.

सर्वांची ओळख करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी युवकांना गुणगौरव करण्यात आला. यानंतर साथी राहुल यांनी मनोगत मांडले. सहदेव पाटकर यांनी वाचनालय सुरु करण्यसाठी कोणी कोणी मदत केली हे सांगितले. युवकांची एक कमिटी तयार करून एक रजिस्टर मेंटेन करावे जेणे करून पुस्तक यादी आणि वाचक यादी मिळेल. यानंतर अध्यक्ष यांनी धम्मचक्र दिनाची पार्श्वभूमी सांगितली. या वाचनालय उभारणी साठी मुंबई येथील परशुराम कावले, कणकवली येथील समाजसेवक सुनील पाटील आणि अनुभव शिक्षा केंद्र राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांची मदत लाभली.

error: Content is protected !!