रक्तदानासारखे जीवदान देणारे पवित्र दान नाही -डाँ.कुबेर मिठारी

वावळ्याचे भरड,भराडी कला क्रीडा विकास मंडळ आयोजित शिबिरात ३४ रक्तदात्यानी केले रक्तदान

मंडळाच्या उपक्रमाचे उपस्थितानी केले कौतुक

चौके ( प्रतिनिधी) : सतत ११ वर्षे या मंडळाच्या वतीने सातत्य राखत भरवण्यात येणारे रक्तदानासारखे जीवदान देणारे शिबिर चौके येथील वावळ्याचे भरड, भराडी कला क्रीडा विकास मंडळ,चौके (रजि.नं एफ ४३६१) यांच्यावतीने सलग ११ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन समाजात आदर्श निर्माण केला आहे.रक्तदान करण्याने एखाद्या व्याक्तीला जीवदान मिळू शकते या सारखे पवित्र कार्य असूच शकत नाही असे प्रतिपादन चौके प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डाँ.कुबेर मिठारी यांनी केले.

यावेळी पेंडूर ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डाँ.संजय पोळ,चौके सरपंच गोपाळ चौकेकर,जिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधिकारी डाँ.पल्लवी सुरवसे,पेंडूर पं.स.सदस्य कमलाकर गावडे,तालुका पत्रकार समिती अध्यक्ष संतोष गावडे,मंडळाचे माजी अध्यक्ष बिजेंद्र गावडे,विद्यमान अध्यक्ष दत्ता गावडे,पुरोषोत्तम पाटणकर तसेच रक्तपेढी जिल्हारुग्णालय कर्मचारी,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्वानी मंडळाच्या उपक्रमाला शुभेच्छा देत कौतुक केले. मंडळाच्या कार्यालयात गुरुवारी घेण्यात आलेल्या या शिबिरात ३४ रक्तदात्यानी उस्फुर्त सहभाग घेत रक्तदान करून सहकार्य केले.सर्व रक्तदात्यांचे वावळ्याचे भरड,भराडी कला क्रीडा विकास मंडळ चौके यांच्यावतीने गुलाब आणि भेटवस्तू देत आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!