भव्य दिव्य होणार अमृत महोत्सव सोहळा
कणकवली (प्रतिनिधी): जिल्हा परिषद शाळा असलदे गावठण नं 2 या शाळेचा अमृत महोत्सव 2 नोव्हेंबर रोजी होत आहे.या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्हा सर्व गावकऱ्यांना आनंद झाला आहे.या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो.मात्र हा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी गावातील ग्रामस्थांना 75 वर्ष वाट पहावी लागली. कै तातोबा विश्राम घाडी यांनी 75 वर्षांपूर्वी गावातील मुलांना इमारत प्रदान केली, कालांतराने इमारत जिल्हा परिषदकडे वर्ग देखील झाली. कै तातोबा विश्राम घाडी यांनी विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बाधणीतून शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.कै तातोबा विश्राम गाडी यांचं कार्य फार मोठा आहे.त्यांना साथ देण्यासाठी काही दानशूर व्यक्तींनी जमीन देखील शाळेला दान केली.या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून या दानशूर व्यक्तींचे सन्मान करण्याची संधी आम्हा गावातील ग्रामस्थांना मिळाली आहे. कै. तातोबा विश्राम घाडी हे आमच्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कुटुंबियांचा योग्य त्या रित्या सन्मान करणार आहोत. या कुटुंबाने सुद्धा शैक्षणिक कार्यासाठी फार मोठ योगदान दिलं आहे. ज्या व्यक्तीने शाळेसाठी जमीन दान केली त्या व्यक्तींचाही सन्मान केला जाणार आहे.गावातील ज्येष्ठ नागरीक,सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, आजी माजी शिक्षक वर्ग,उच्च शिक्षित विद्यार्थी,10.वी 12 वी पदवीधर,तसेच राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी,पदाधिकारी रहाणार उपस्थित त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे.
2 नोव्हेंबर 2023 रोजी हा अमृत महोत्सव सोहळा संपन्न होणार आहे त्यावेळी सकाळी 7.30 वाजता सत्यनारायणाची महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे ,तसेच सकाळी 9.30 ते 9.45 राष्ट्रगीत,9.45 ते 10 वाजता स्वागत गीत,10 ते 10.15 प्रस्तावना,10 .15 ते 10.30 प्रमुख पाहुण्यांचे स्वागत,या कार्यक्रमासाठी मा.प्रदीप कुमार कुडाळकर ,प्राथमिक शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत तर मा. किशोर गवस गट शिक्षणाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10.30 ते 10.45 शाळा माहिती पुस्तकीचे प्रकाशन, 10.45 ते 12.15 सत्कार समारंभ, 12.15 ते 12.30 वाजता मनोगत, दुपारी 2 ते 3 महाप्रसाद,3 ते 6 महिलांचे हळदी कुंकू होणार आहे.सायंकाळी 6 ते 7 स्थानिक गावातील भजन,आणि रात्री 8 वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम करणार आहेत. अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल तांबे, सचिव अनंत पाताडे, उपाध्यक्ष शामराव परब, सहसचिव सुरेश सुतार,सदस्य देविदास जांभळे, जयप्रकाश पाताडे,सचिन परब,संतोष घाडी,अशोक पाताडे, महादेव परब,दिनेश शिंदे, सदाशिव घाडी,प्रशांत तांबे,सुदिन तांबे