कणकवली यावर्षीही भरणार दिवाळी बाजार

6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर दरम्यान भरणार दिवाळी बाजार

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : दिवाळी निमित्त यावर्षीही समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने दिवाळी बाजार भरविण्यात येणार आहे. मागील 2 वर्षे ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.त्यामुळे यावर्षीही जनतेची मागणी विचारात घेऊन दिवाळी बाजार हायवे उड्डाणपुलाखाली पेट्रोल पंपासमोर एसटी बस स्थानक शेजारी कणकवलीत भरवणार असल्याचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडें यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी माजी नगरसेवक अभि मुसळे, जावेद शेख, पंकज पेडणेकर, राजा पाटकर, सागर होडावडेकर, लवराज झेमने आदी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या दिवाळी बाजार चे उदघाटन 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार असून 11 नोव्हेंबर पर्यंत हा दिवाळी बाजार सुरू असणार आहे. नगरपंचायत मध्ये सत्तेत असताना सुरू केलेला हा दिवाळी बाजार कायम सुरू ठेवणार असून सत्ता महत्वाची नसून हॅन्डमेड वस्तू बनवणाऱ्या उत्पादकांच्या वस्तुंना मार्केट उपलब्ध करून देणे. जनतेला बाजारभावापेक्षा अल्प दरात दर्जेदार वस्तू दिवाळी सणात उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचेही नलावडे म्हणाले. कुंभार समाजातील कारागिरांनी बनवलेले मातीचे आकाशकंदील, पणत्या, आदि विविध वस्तूंची विक्री या दिवाळी बाजारात होणार आहे.कणकवली शहरातील महिला बचत गटांना सुद्धा यामध्ये प्राधान्य देण्यात येणार असून, फराळ, आकाशकंदील व तत्सम पर्यावरण पूरक वस्तू या दिवाळी बाजारात उपलब्ध असणार आहेत. एकूण 32 स्टॉल असणार असून स्टॉल धारकांना लाईट व स्टॉल सेवा समीर नलावडे यांच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गतवर्षी 10 लाख रुपयांची उलाढाल या दिवाळी बाजारात झाली होती. लोकल ते व्होकल या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेला पूरक असा हा दिवाळी बाजार भरवण्यात येत आहे. स्टॉल नोंदणीसाठी मेघा गांगण, अण्णा कोदे, राजा पाटकर, 9860380738 पंकज पेडणेकर 9890030289 जावेद शेख यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!