उबाठा चा दारुण पराभव
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओटव ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा अक्षरशा धुव्वा उडाला. सरपंच पदी भाजपा प्रणित पॅनलच्या रोहिता राजेश तांबे या 264 मते मिळवत विजय ठरल्या. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कविता धर्माजी तांबे यांना 85 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 1 मध्ये दीक्षा दिलीप जाधव यांना 103 तर कविता धर्माजी तांबे यांना 19 व नोटा 3, प्रभाग क्रमांक 3 मध्ये वैष्णवी विठ्ठल गावकर 85, अनुस उत्तम तांबे 32 नोटा 3 तर याच प्रभागात लता लवु तेली 79, गार्गी गणेश गावकर 39 नोटा 2 अशी मते मिळवून भाजपा प्रणित पॅनल ने बाजी मारली. यापूर्वी प्रभाग 2 मधील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या ग्रामपंचायतीवर भाजपची एक एकतर्फी सत्ता प्रस्थापित झाली.