मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्यावतीने १४ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात ऑटोस्कोपी, पित्ताशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड, फुफ्फुस, मेंदूच्या रक्तवाहिन्या, हाडांचे विकार, हाड खनिज घनता, लहान हाडांचे विकार, हाडांचे आरोग्य, हयुमन टॉक्सिन, एसीजी रिपोर्ट, ब्लड शुगर, मिनरल्स, जीवनसत्व, अॅमिनो अॅसिड, को- ऐंझाइमस, अंत: स्त्राव प्रणाली, रोगप्रतिकारक प्रणाली, रक्तातील हेवी मेटल, लठ्ठपणा, अॅलर्जी, त्वचा व त्वचे संबंधित घटक, शरीर रचना विश्लेषण, चॅनल्स आणि कोलेस्ट्रॉल्स, रक्तातील चरबीचे प्रमाण, मोठे आतड्यांचे आरोग्य, थायरॉईड कार्यक्षमता, पल्स ऑक्सिमीटर, ट्रेस मिनरल, स्त्रियांकरता गायनेकोलॉजी, स्तनाचे विकार, मासिक पाळी, बेसिक फिजिकल क्वालिटी, पांढऱ्या पेशी कॉलेजन मॅट्रिक्स, हृदय व मेंदूचा रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता, ऑपथाल्मोस्कोपी डोळ्यांचे आरोग्य याबाबतची तपासणी केली जाणार आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी, महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. ओटवणेकर यांनी केले आहे.