खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे नुकतेच या शाळेतील किशोरवयीन मुलीसाठी तज्ञ महिला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक कार्यशाळा घेण्यात आली. या आरोग्य मार्गदर्शन कार्यशाळेचे उद्घघाटन खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्राप्ती कट्टी, खारेपाटण केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर तसेच या शाळेतील किशोरवयीन मुलीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी खारेपाटण येथील प्रसिद्ध महिला डॉक्टर उज्ज्वला येळकोटे आदी मान्यवर पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. केंद्र शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. उज्ज्वला येळकोटे यांनी शाळेतील किशोरवयीन मुलीच्या आरोग्य विषयी मार्गदर्शन केले.तसेच या कार्यशाळेत किशोर वयीन मुलींच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण केले.तसेच कीशोरवस्था मध्ये वाढत्या वयाबरोबर आपल्या शरीरामध्ये होणारे बदल व आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी या विषयी अनमोल असे मार्गदर्शन यावेळी डॉ.उज्ज्वला येळकोटे यांनी शाळेतील मुलींना केले. या कार्यशाळेला शाळेच्या शिक्षिका श्रीम रेखा लांघी,अलका मोरे,रुपाली पारकर, आरती जेजोन,स्मिता कोरगावकर, कोंडविलकर सर, श्रीम.अमृता ब्रम्हदंडे, अबीदा सारंग आदी शिक्षवृंद उपस्थित होते. यावेळी सर्व किशोरवयीन मुलीसाठी सॅनिटरी नॅपकिन चे मोफत वाटप करण्यात आले.तर खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर यांनी यावेळी किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन करून खारेपाटण केंद्र शाळेच्या शैशनिक कर्या बरोबरच सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत किशोर वयीन मुलीसाठी मार्गदर्शन संपन्न











