रमेश गावडे यांचे जम्मू ते मुंबई यशस्वी सायकलिंग!

ब्युटीज ऑन व्हील्स कडून अभिनंदन

मसुरे (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग मधील मालवण तालुक्यातील चौके गावचे सुपुत्र रमेश गावडे यांनी जम्मू काटरा ते मुंबई हा २०५६ किमी प्रवास १८ दिवस सायकलिंग करत नुकताच पूर्ण केला आहे. इन्कमटॅक्स मध्ये अधिकारी पदावर असलेल्या गावडे यांच्या या अतुलनीय कामगिरीचे कौतुक होत आहे. आरोग्यविषयक व स्वच्छता अभियान जनजागृतीसाठी अशा पद्धतीने आपण मोहीम राबवत असल्याचे श्री गावडे यांनी सांगितले. यापूर्वी गावडे यांनी मु़बंई ते मालवण नंतर मुंबई ते कन्याकुमारी असे यापूर्वी सायकलिंग केले आहे. रनिंग मध्ये हाफ व फुल मॅरेथॉन सुध्दा तेवढ्याच ताकदीने पूर्ण केली आहे. सिंधुदुर्ग मधील सायंकलिंग आणि रनिंग इव्हेंट मध्ये सुद्धा ते भाग घेतात. गावडे यांच्या या कामगिरीबद्दल ब्युटीज ऑन व्हील्स ग्रुपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!