बिडवाडी हायस्कुलचे शिक्षक श्रीकांत शेट्ये यांची आत्महत्या

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिक्षक श्रीकांत शिवराम शेट्ये (49) रा. नाधवडे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. शेट्ये हे कणकवली बिडवाडी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
शेट्ये हे नोकरी निमित्त कणकवली येथे वास्तव्यास होते. तेथे ते आपल्या परिवारासह रहात होते. अधून मधून ते आपल्या मूळ नाधवडे गावी येत होते. सध्या विद्यालयाना दिवाळी सुट्टी असल्याने गुरुवारी सायंकाळी ते एकटेच नाधवडे येथे आले होते.

गुरुवारी नाधवडे येथे आल्यानंतर रात्री जेवून ते झोपले होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत ते उठले नाहीत. त्यामुळे त्यांच्या घराच्या शेजारीच राहणारी त्यांची बहीण श्रुती खाडये ही त्यांच्या घरी गेली. यावेळी तीने बाहेरून त्यांना हाक मारली. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने बहीण श्रुती घरात गेली असता श्रीकांत हे घराच्या आतील खोलीच्या पंख्याला नायलॉनच्या रसीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. घडलेल्या घटनेने बहीण श्रुती हिने भेदरलेल्या स्थितीत आरडा ओरड केली. त्यामुळे शेजारी धावून गेले.

या घटनेची खबर श्रीकांत यांचा चुलत पुतण्या भावेश रघुनाथ शेट्ये याने पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस हवालदार रमेश नारणवर करीत आहेत. श्रीकांत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

error: Content is protected !!