रंजित खडिया या झारखंडमधील मानसिक रूग्ण तरूणाचे संविता आश्रम कडून कुटुंब पुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : रंजित खडिया या झारखंडमधील मानसिक दृष्ट्या रूग्ण असलेल्या आदिवासी युवकाचे नुकतेच संविता आश्रमकडून कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले आहे. रंजित रोजगारासाठी गोव्याकडे आलेला होता. कणकवली जवळील जानवली गावात निराधार व मानसिक रूग्णावस्थेत आढळलेल्या रंजितला मानसोपचार आणि सुरक्षेसाठी त्यास कणकवलीचे पोलिस निरिक्षक अमित यादव यांनी जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांचेशी संपर्क साधून दि.३ नोव्हेंबरच्या रात्री ११-४५ वाजताचे दरम्यान पणदूरच्या संविता आश्रमात दाखल केले.

रंजितला आश्रमात दाखल केल्याच्या दुस-याच दिवशी त्याने दिलेल्या गावचे संक्षिप्त माहितीवरून जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी गुगल सर्चद्वारे अवघ्या तासाभरात रंजितचे गाव लोधमा, ग्रामपंचायतः तपकरा तालुकाःपालकोट, जि.गुमला ही माहिती निश्चित करून तपकरा ग्रामपंचायतच्या सरपंच कांती करकेट्टा यांचा संपर्क नंबर मिळविला. व सरपंच कांती यांचे मार्फत रंजितच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला.संविता आश्रमात उपचार सुरू असताना रंजित पुन्हा काळजीवाहकांची नजर चुकवून तेथून पळाला. रंजितचा भाऊ प्रकाश खडिया यांना तो संविता आश्रमात दाखल असल्याची माहिती मिळताच त्यांनी व अन्य एक नातलग यांनी तात्काळ झारखंडहून कुडाळ गाठले. आश्रमातून पुन्हा हरवलेल्या रंजितचा संविता आश्रमचे देवु पाटिल, आशिष कांबळी, विजया कांबळी व माधव पाटिल यांचे टिमसह शोध घेतला असता तो कुडाळ येथे मिळून आला. मधल्या काळात रंजितला मानसोपचार तज्ञ डाँ.धुरी यांना दाखवून त्यांचे माध्यमातून त्याचे आवश्यक मानसोपचारांसाठी पाठपुरावा करण्यात आला.भाऊ प्रकाशसह कुडाळहून मुंबईमार्गे रंजितला घेवून त्याचा भाऊ प्रकाश आणि मेव्हणा विष्णू करकेट्टा हे आज झारखंडकडे रवाना झाले.

error: Content is protected !!