कोल्हापूर करांना आ. सतेज पाटील यांची दिवाळी भेट

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचं पाणी थेट पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दाखल

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचं पाणी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आज रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी पोहोचल . आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्रीताई जाधव यांच्या हस्ते आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या पाण्याचं विधिवत पूजन करण्यात आलं .आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी नतमस्तक होतपाण्याला नमन केलं. आमदार सतेज पाटील यांच्या अथक प्रयत्नातून कोल्हापूरवासियांसाठी सुमारे 488 कोटींची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पुर्णत्वाला आलीय .कोल्हापूरकरांना किमान 2050 सालापर्यंत स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं, या उद्देशानं आमदार सतेज पाटील यांनी या योजनेसाठी जोरदार प्रयत्न करून, पाठपुरावा केला होता.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील ,आमदार जयश्रीताई जाधव यांच्या हस्ते, तसंच आमदार सतेज पाटील गटाचे आणि काँग्रेसचे माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, सुवासिनी यांच्या उपस्थितीत रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रात काळम्मावाडीच्या पाण्याचं विधीवत पूजन करण्यात आलं. आमदार सतेज पाटील,आमदार ऋतुराज पाटील यांनी या पाण्याला वंदन केलं . यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली . त्यानंतर हलगीच्या ठेक्यावर आमदार सतेज पाटील ,आमदार ऋतुराज पाटील, यांच्यासह सर्वांनीच जल्लोष साजरा केला . सुवासिनींनी हे पाणी पाणी कलशामध्ये भरून,करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी अर्पण केल. यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, मधुकर रामाणे, माजी महापौर अश्विनी रामाणे, राहुल माने, माजी उपमहापौर अर्जुन माने, भूपाल शेटे,दुर्वास कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .

error: Content is protected !!