मुंबई पदपथावर राहणा-या बालकांनी विद्यार्थी दिना निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन
खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या दहिसर येथील संगम सेंटर आणि खाररोड येथील सुरक्षा डे केअर सेंटरमधील बालकांच्या सहभागातून संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमात ७ नोव्हेंबर या राज्य विद्यार्थी दिना निमित्ताने समर्थ आश्रमातील ९ नोव्हेंबर,२३ च्या बाल आनंद शिबिरादरम्यान भारत रत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डे केअर सेंटरमधील कुमार राज पटेल आणि कुमारी शितल जग्या पवार या बालकांच्या हस्ते डाँ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले.
भारत रत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळाप्रवेशाचा दिवस महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दारिद्र्याच्या कारणाने कुटुंबासह पदपथावर वंचिततेचे जीवन जगणा-या मुंबईतील दहिसर आणि खाररोड येथील बालके कु.रिया सोळंकी आणि कु.अंजली कदम यांच्या हस्ते यावेळी आश्रमात तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्र ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेच्या डे केअरमधील बालकांसाठी समर्थ आश्रमात दोन दिवशीय बाल आनंद शिबिर आणि गणेशपुरी येथील गरम पाण्याचे झरे पाहण्यासाठी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान आश्रमात विद्यार्थी दिनी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रस्त्यावरच्या निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानपुर्ण जीवन जगता यावे यासाठी संदिप परब यांची जीवन आनद संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या आश्रम , शेल्टर होम व डे केअर सेंटर्सद्वारे हे कार्य सुरू आहे.जीवन आनंद संस्थेच्या मुंबई विभागीय टिममधील विश्वस्त किसन चौरे यांचेसह संपदा सुर्वे,भाईदास माळी, दिपाली माळी, हेमलता पवार, सुनिता भडारी, मिना ताई, रत्ना लांघी, दिपक अडसुळे, चंदा छेत्री यांची आयोजनात महत्वाची भुमिका राहिली.


