सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी विधानसभेतील ८ ग्रामपंचायत निवडणुक झाल्या त्यापैकी ५ सरपंच व ३० सदस्य निवडून येऊन मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपा एक नंबर वर असल्याचे सिद्ध केले सर्वप्रथम सावंतवाडी विधानसभेच्या वतीने आम.श्रीकांत भारतीय यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश का. का.सदस्य शरदजी चव्हाण, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई , मुख्यालय प्रभारी व जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, मनोज नाईक, निलेश सामंत, वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, साईप्रसाद नाईक, रविंद्र मडगांवकर, सुहास गवंडळकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, महीला मोर्चा प्रदेश का. का.सदस्या मोहीनी मडगांवकर, रमेश दळवी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्रीकांत भारतीय म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारने व मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या राज्य सरकारने आपल्या कामाने जनतेमध्ये विश्वास निर्माण केला आहे. भाजपा कडे सत्ता दिल्यास आपल्या गावचा विकास होऊ शकतो , अशी खात्री वाटली व त्यामुळेच भाजपा निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला . विधानसभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकरर्त्यांचे अभिनंदन करून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हिच विजयाची परंपरा कायम ठेवा , असे आवाहन केले .यावेळी सावंतवाडी विधानसभेतील बहुसंख्य सरपंच व उपसरपंच , लोकप्रतिनिधी व पदाधिकारी , विविध सेलचे पदाधिकारी , सुपर वॉरियर्स , शक्तिकेंद्र प्रमुख , बुथप्रमुख तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले व आभार प्रदर्शन महीला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी केले .













