कणकवली (प्रतिनिधी) : सांगवे आंबेडकरनगर येथील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. सांगवे समाजमंदिरच्या अपूर्ण बांधकामाच्या मुद्याला अनुसरून शिवसेनेवर विश्वास ठेवत प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले. सांगवे आंबेडकरनगर येथील संतोष कांबळे, महेश कांबळे, दिनकर कांबळे, महेंद्र चव्हान, या सह अनेकांनी कुणाल सावंत, सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके यांच्या नेतृत्वाखाली सतीश सावंत यांच्या हस्ते शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विभागप्रमुख आनंद आचरेकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, आर. एच. सावंत, दिनेश वाळके, गणेश शिवडावकर, संजय सावंत, अरविंद सावंत, सचिन सावंत, सुदर्शन रासम, राजू टाकेकर, संदेश गुरव, निलेश सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.













