नडगिवे गावचे माजी सरपंच गजानन सावंत यांचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी ) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावचे सुपुत्र तथा गावचे माजी सरपंच गजानन तुकाराम सावंत यांचे आज शनिवार दी. १८/११/२०२३ रोजी स.११.०० वाजता मुंबई नायर हॉस्पिटमध्ये अल्पशा आजाराने वयाच्या ६८ व्या वर्षी दुःखद निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी खारेपाटण दशक्रोशित समजताच सर्वत्र हळहळ व्यक करण्यात येत आहे. गजानन सावंत हे हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत तयार झालेले कट्टर कार्यकर्ते होते.तर कोकणचे नेते नारायण राणे यांचे विश्वासू व शिलेदार कार्यकर्ते होते.खारेपाटण विभागात नारायण राणे यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते म्हणून पक्षाचे काम करत असतानाच नडगिवे गावचे सरपंच म्हणून देखील त्यांनी काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा १ मुलगी २ नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!