देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने रविवार १९ फेब्रुवारी 2023 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवजयंती उत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने डॉ. सावंत कंपाउंड कॉलेज नाका येथे भव्य गडकिल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी ८:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक, सकाळी १०:०० वाजता कॉलेज नाका ते देवगड किल्ला येथे ढोल ताशांचा गजरात मोटार सायकल रॅली तसेच सकाळी ११:३० वाजता कु. सुशील पंडित याचा पोवाडा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक इ. क्षेत्रात भरीव कामगिरी व यश संपादन करणाऱ्या मराठा बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचप्रमाणे खास आकर्षण म्हणून शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. तरी तालुक्यातील सर्वांनी व विद्यार्थी वर्गाने या शिवकालीन नाण्यांच्या प्रदर्शनास उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड तालुका मराठा समाज अध्यक्ष संदीप साटम यांनी केले आहे.
यावेळी अध्यक्ष संदीप साटम, अविनाश सावंत, किसन सूर्यवंशी, अमित साटम, शरद ठुकरूल, मिलिंद माने, काका राऊत, अजित राणे, प्रवीण सावंत, बाप्पा माने, मधुकर नलावडे, पप्पू कदम, गौरव खानविलकर, शशांक साटम, पंकज दुखंडे, सूर्यकांत पाळेकर, अमित कदम, संतोष नाईकधुरे, स्वप्नील राऊत, केदार सावंत, गिरीश माने आदी उपस्थित होते.