चिंदर आकारी ब्राह्मण देव हरिनाम सप्ताह 23 नोव्हेंबर रोजी..!
आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथील ऐतिहासिक शिवकालीन दुधसागर तलावाकाठी वसलेल्या जागृत देवस्थान आकारी ब्राह्मण देवाचा सातप्रहराचा हरिनाम सप्ताह गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निमित्त सकाळी विधिवत पूजा, सकाळी 9.30 हरिनाम सप्ताहास स्थानिक भजनांनी सुरुवात, संध्याकाळ पासून विविध भजनी मंडळाचे भजनी मेळ, शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी हरिनाम सप्ताहाची सांगता व महाप्रसाद तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गावठणवाडी उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.