सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा चौके येथे संचालक बाबा परब यांच्या हस्ते देण्यात आले पत्र
चौके (अमोल गोसावी ): शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअतर्गत चौके येथे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा चौके यांच्यावतीने चौके येथील या योजनेचा दोन लाख रुपये विमा लाभ मिळालेला लाभार्थी व्यक्ती कु.विनायक शंकर मांजरेकर (मयत खातेदार ) यांचे वारस भाऊ कु. गणेश शंकर मांजरेकर याला जिल्हा बँक संचालक संदीप उर्फ बाबा परब यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.यावेळी पूर्णांनंद सरमळकर -बँक विकास अधिकारी मालवण, येसूबाई कादळगावकर -शाखा व्यवस्थापक जयेश लाड,सुभाष शेट्ये बँक कर्मचारी उपस्थित होते.