भाजपचे कुडाळ, मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ शहरातील प्रभाग ७ मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या उपस्थितीत आणि जेष्ठ नागरिक लक्ष्मण कुडाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कुडाळ नगरपंचायत क्षेत्रामध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधी मधील विकास कामांची भूमिपूजन करण्यात आली प्रभाग क्रमांक सात मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील विकास कामांची भूमिपूजन करण्यात आली भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही भूमिपूजन झाले यावेळी प्रदेश सदस्य संध्या तेरसे, बंड्या सावंत, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे, संजू परब, आनंद शिरवलकर, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, चांदणी कांबळी, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक राकेश कांदे, मुक्ती परब, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक रामचंद्र कुडाळकर, नंदकिशोर कुडाळकर, नितेश कुडाळकर, बाळा कुडाळकर, रजनीकांत कदम, निलेश कुडाळकर, दत्तप्रसाद जाधव, जनार्दन कुडाळकर, पांडुरंग कुडाळकर, कपिल कुडाळकर, अजित कुडाळकर, किरण कुडाळकर, रुपेश कुडाळकर, साईनाथ कुडाळकर, ओंकार कदम, ऋतुराज जाधव, संदेश मालवणकर, दशरथ केळुसकर, अमन कुडाळकर, संजय कुडाळकर, तुषार जाधव, रामचंद्र कदम आदी उपस्थित होते.