शिवसेना नेते अतुल रावराणे यांची खा.राऊत यांच्याकडे मागणी
कणकवली (प्रतिनिधी): कणकवली विधानसभा क्षेत्रातील 34 गावे अद्याप बीएसएनएल मोबाईल टॉवर सुविधा पासून वंचित आहेत. त्या गावांमध्ये बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर होण्यासाठी शिवसेना कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अतुल रावराणे यांनी खासदार विनायक राऊत यांना निवेदन दिले आहे. यामध्ये वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे, जांभवडे, सडूरे, ढाणेगड, केरवडे तर्फ सौंदाळे, केरवडे तर्फ खारेपाटण, नेर्ले, आखवणे, भोम, खडकदरा, तांबळघाटी, अडूळे, संकपाळवाडी, जांभवडे पालांडेवाडी, ऐनारी, लोरे नं. 2, मौदे, नानीवडे, धालवली, खुडी, हिंदळे, शिरगांव चौकेवाडी, चाफेड, तळेबाजार, तळवडे, वेलगिवे, मोंड, नारींग्रे, जामसंडे भटवाडी, देवगड मळई, जामसंडे बळकवाडी, खालची खाकशी, देवगड कट्टा, आरे ही गावे असून कणकवली तालुक्यातील रांजणगाव, वागदे देऊळवाडी, वारगांव. या गावांचा समावेश आहे.