बुडक्याची वाडी मंडळाची दिंडी ठरली खास आकर्षण
मसुरे (प्रतिनिधी): कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथे लिंगेश्वर मंदिरामध्ये १७ नोव्हेंबर रोजी सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या निमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सप्ताहामध्ये दररोज रात्री ग्रामस्थांनी तसेच इतर गावातील भजनी मंडळांनी सुमधुर भजनाचे सादरीकरण केले. यामध्ये सहाव्या रात्री बुडक्याचीवाडी मंडळाची ट्रीकसीन युक्त “पृथ्वी प्रदक्षिणा” ही दिंडी आकर्षण ठरली. सोबत ढोल पथक , फटाक्यांच्या आतीषबाजीने रंगत आणली. यावेळी गावातील भजनी मंडळासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.