प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा – सिंधुदुर्ग
आचार (प्रतिनिधी): कै. नितीन परब यांनी आपल्या जीवनात सामाजिक कार्यात झोकून देत काम केले. रक्तदानासारखी चळवळ त्यांनी शिरोडा पंचक्रोशीत सुरु केली. सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन विविध सामाजिक उपक्रम घेऊन एक सच्चा समाजसेवक म्हणुन त्याने ख्याती मिळवली. त्याने सुरु केलेली ही सामाजिक चळवळ त्याच्या पश्चात सुरु ठेवणे, हीच खरी कै. नितीन परब यांना श्रद्धांजली ठरेल. असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले. ऑटो रिक्षा चालक – मालक संघटना – गांधी चौक, शिरोडा आणि मित्रमंडळाच्या वतीने कै. नितीन परब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम कै. नितीन परब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी सभापती प्रीतेश राऊळ, बाबली वायंगणकर, ऑटो रिक्षा चालक – मालक संघटना अध्यक्ष राजेश भानजी, माजी सरपंच मनोज उगवेकर व विजय पडवळ, योगेश प्रभु, सामाजिक कार्यकर्ते बाबल गावडे, ग्रामपंचायत सदस्य मयुरेश शिरोडकर व हेतल गावडे, अण्णा झाटये, राहुल गावडे, रिक्षा युनियन चे कृष्णा गडेकर, गुणा धानजी, संजय गडेकर, दिलीप मोरजकर, पुरुषोत्तम धानजी, सचिन शेलटे, महेश दळवी, दिगंबर केरकर, सुरेश परब, सुरेंद्रनाथ पेडणेकर, तसेच रक्तदाते रुपेश परब, सोमनाथ वेंगुर्लेकर, गणेश लोके, निखिल आरोसकर, कृष्णा वेंगुर्लेकर, अक्षय जगदाळे, सागर फडतरे तसेच जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.