खारेपाटण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या तालुक्यातील मसूरे या गावातील 55 वर्षीय निराधार गृहस्थ बागवे आपल्या वडिलोपार्जित घरात एकटेच राहत होते.मात्र त्यांच्या पायाला मोठी जखम होऊन त्यामध्ये किडे पडले होते.ही माहिती सविता आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांना समाजातच त्यांनी तातडीने या निराधार व्यक्तिची भेट घेत त्यांना धीर दिला.व त्यांना पुढील उपचार सेवेसाठी सविता आश्रम पणदूर मध्ये नुकतेच दाखल करुन घेतले. निराधार गृहस्थ बागवे यांच्या डाव्या पायातील जखमेतून सुमारे 20 किडे काढण्यात आले. व जखम पूर्ण साफ व स्वच्छ करण्यात आली.सविता आश्रम संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यानी स्वता या निराधार बांधवांच्या जखमेतील किडे साफ केले.यावेळी त्याचे सहकारी उदय कामत,सागर व जसवंत यांचे त्यांना सहकार्य लाभले. शेवटी पोलिसांच्या मदतीने वंचित निराधार बांधव बागवे यांना पणदूर येथील सविता आश्रमात दाखल करण्यात आले.