खारेपाटण (प्रतिनिधी): भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी येथील पंचशील नगर येथे बुद्धविहारात धम्म वर्गाच्या वतीने नुकताच भारतीय संविधान दिन आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पंचशील नगर खारेपाटण येथील रहिवासी व धम्म वर्गातील मुले उपस्थित होती. पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे बौद्धचार्या संतोष पाटणकर यांनी केले होते. तर खारेपाटण येथील बुद्धविहारात धम्म संस्कार वर्गाच्या वतीने मुलानी भारतीय संविधान पुस्तकेतील प्रास्ताविकाचे सामुदायिक वचन केले. व भारतीय संविधान बदल असलेला आपला आदर व्यक्त केला. या उपक्रमात कु.सांची संतोष पाटणकर, कु. संबोधी संदेश पाटणकर, कु. सौंदर्या संदीप पाटणकर,कु. सुप्रबुद्ध संदेश पाटणकर,कु.शौर्य महेंद्र पवार या विद्यार्थ्यांनी या मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन बौध्दचार्या संतोष पाटणकर यांनी भारतीय संविधान व त्याचे हक्क आणि अधिकार याविषयी उपस्थितांना विस्तृत माहिती दिली. व आपल्या देशातील लोकशाही तसेच नागरिकांचे हक्क व अधिकार जिवंत व अबाधित ठेवायचे असेल तर भारतीय संविधान हे पुस्तक प्रत्येक व्यक्तिच्या घरात असायला हवे असे प्रतिपादन संतोष पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केले.