आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावठणवाडी येथील, गावठणवाडी स्मशानभूमी शेड बांधणे – पाच लाख, बौध्दवाडी पायवाट बांधणे- पाच लाख, चर्मकारवाडी पायवाट बांधणे – पाच लाख अशा विविध विकास कामांचे मंगेशशेठ गांवकर, धाकू चिंदरकर, काशिराम पवार यांच्या हस्ते आज भूमी पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच स्वरा पालकर, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, पोलिस पाटील दिनेश पाताडे, संतोष अपराज, अरविंद घाडी, सचिन जाधव, नितीन घाडी, गणेश पाटणकर, कृष्णा पवार, गोपाळ चिंदरकर, एकनाथ पवार, श्रीकांत कानविंदे, वसंत पवार, प्रकाश पवार, विश्राम गोसावी आदी उपस्थित होते.