एक दिवस छोट्यांसाठी” ची तयारी अंतिम टप्प्यावर
माजी नगराध्यक्ष समीर नलावडें नि तयारीची केली पाहणी
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात समीर नलावडे मित्र मंडळ आयोजित एक दिवस छोट्यांसाठी या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्या झाली असून या चिमुकल्यांसाठीच्या या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा आज माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. या कार्यक्रमासाठी सिंधु संकल्प अकादमी प्रस्तुत रोलर्स म्युझिक चे गायक संज्योती जगदाळे, हर्षद मेस्त्री, साक्षी मांजरेकर निवेदक संजय धुरी, यांची प्रमुख उपस्थिती असणार
आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जादूगार प्रसाद यांचे मनोरंजनात्मक व चित्त थरारक जादूचे प्रयोग होणार आहेत. लकी ड्रॉ, प्रत्येक मुलांना कुपन असे व अन्य धमाकेदार कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाची उत्सुकता लहानग्यांमध्ये वाढली आहे. या सर्व कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्यात आली असून स्टॉलसाठी जागा अपुरी पडू लागली आहे. या पाहणी दरम्यान माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, राजू गवाणकर, संदीप नलावडे, विजय राणे, नवराज झेमणे, आदी उपस्थित होते.