नॅशनल हायवेवर हळवल फाट्यावर रंबलर घालण्यास सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या मागणीला यश

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हळवल फाटा येथे अपघात होत असलेल्या वळणावर अपघात रोखण्यासाठी अखेर “रम्बलर” घालण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशी व वाहनधारकातून समाधान होत आहे. याबाबतची मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी राष्ट्रीय महामार्गाकडे केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. त्या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणामुळे अपघात होत. वाहनधारकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठे होते. त्यामुळे त्या ठिकाणी रम्बलर घालण्यात यावे, अशी मागणी नाईक यांनी केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.

error: Content is protected !!