छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रॅकसाठी साईराज वावरेची निवड

निवडीबद्दल संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले अभिनंदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग मधुन अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी या प्रशालेचा कॅडेट साईराज विनायक वावरे याचे छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रॅक पन्हाळा ते विशाळगड या कॅम्प साठी निवड झाली होती २०-११-२०२३ ते २७-११-२०२३ पर्यंत सदर कॅम्प पुर्ण केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज ट्रेल ट्रॅक या नॅशनल कॅम्पच्या वतीने प्रमाणपत्र व पदक देऊन त्याला सन्मानित करण्यात आले होते त्याच्या या यशाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यास पुढील वाटचालीसाठी यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, एनसीसी सिटीओ एस.टी.तुळसणकर, वाय.जी.चव्हाण, पी.पी.सावंत आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!