मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
मसुरे (प्रतिनिधी): आज माझ्या सेवानिवृत्ती दिवशी आपण सर्व सहकाऱ्यांनी माझा केलेला सन्मान सदैव स्मरणात राहील. नोकरीच्या कालावधीत सर्व जेष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचे चांगले सहकार्य मिळाल्या मुळे शेतकऱ्यांसाठी चांगले काम करता आले. तालुका कृषी अधिकारी म्हणून जबाबदारीच्या पदावर काम पाहत असताना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाण्याचा योग आला. कृषी विभागाच्या विविध योजना उपक्रम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच कल राहिला. कृषी विभागात काम करताना शेतकऱ्यांपर्यंत पोहचून कामाच्या व्यतिरिक्त त्यांच्याशी हितगुज, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होता आलं. तुमचे सर्वांचे प्रेम, जेष्ठांचे आशीर्वाद असेच यापुढे पाठीशी राहुध्या असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी मालवण विश्वनाथ गोसावी यांनी कट्टा येथे केले.
मालवण तालूका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी शासकीय सेवेतील ३७ वर्षे ४ महिने अशा प्रदीर्घ यशस्वी कारकिर्दी नंतर नियत वयोमाना प्रमाणे सेवानिवृत्त झाले. या निमित्त गोसावी यांच्या सत्कार तथा निरोप समारंभाचे आयोजन तालूका कृषि अधिकारी कार्यालय मालवण अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांचे वतीने कट्टा ग्रामपंचायत सभागृहा मध्ये करण्यात आले होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकूमार राऊत , उपविभागीय कृषी अधिकारी सावंतवाडी पोपटराव पाटील , तंत्र अधिकारी काळेल, आलते , श्रीम मुळे मॅडम, तालूका कृषि अधिकारी कणकवली, तालुका कृषी अधिकारी वेंगुर्ला श्देसाई, कुडाळ तालुका कृषी अधिकारी कोळी, किसान मोर्चाचे उमेश सावंत , माजी पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे , तळगाव सरपंच लता खोत तसेच मालवण व इतर तालूक्यातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी , मालवण व कूडाळ तालूक्यातील शेतकरी, गोसावी कुटूंबिय उपस्थित होते.
आपल्या कामाप्रती प्रामाणिकपणा व सचोटी बाळगणा-या कर्तव्यदक्ष अधिका-यांची उणीव कृषी विभाग आणि शेतकरी बांधवांना निश्चीतच जाणवेल. असा अधिकारी पून्हा होणे नाही असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकूमार राऊत यांनी यावेळी केले. गोसावी हे शासकीय सेवेतील धकाधकीच्या जीवनातून मोकळा श्वास घेतील याबाबत आनंद आहेच परंतू एका जबाबदार अधिका-याला आपण मूकणार आहोत याचे दूःखही आहे अशा समिश्र भावनाही अधिनस्त कर्मचारी यांनी व्यक्त केल्या. यावेळी गोसावी याना सेवेच्या पहिल्या दिवशी नोकरीत हजर करून घेणारे व सेवानिवृत्ती दिवशीही उपस्थित असणारे सेवानिवृत्त कर्मचारी भाऊ पाताडे यांनी विश्वनाथ गोसावी यांची यशोगाथाच सर्वांसमोर मांडली. मंडळ कृषी अधिकारी आचरा धनंजय गावडे, माजी प स सदस्य यांनी गोसावी यांच्या जनसामान्यात मिसळून काम करण्याच्या कार्यपद्धतीचे भरभरून कौतूक केले. पोपटराव पाटील यांनी गोसावी हे अधिका-या पेक्षा हाडाचे कार्यकर्तेच भावले असे गौरवोद्गार काढले. यावेळी गोसावी, पत्नी विशाखा गोसावी आणि आई यांचा विजयकूमार राऊत यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोईप कृषी पर्यवृक्षक श्रीपाद चव्हाण यांनी तर आभार कृषी सहायक पवनकूमार सौंगडे यांनी मानले. तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी गोसावी व त्यांचे कुटूंबिय यांचे वर पूष्पवृष्टी करत अनोख्या पद्धतीने निरोप दिला.
सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालूका कृषी अधिकारी कार्यालयातील दत्तात्रय बर्वे , सिताराम परब , दशरथ सावंत , धनंजय गावडे , श्रीपाद चव्हाण , संचिता फाळके , राणी थोरात , निलेश गोसावी , पवनकूमार सौंगडे , अमृता राणे , विद्या कूबल , संजीवनी वाघमारे , स्नेहल जिकमडे , आनंद धूरी , मिलींद कदम , सूनिल कदम , अश्विन कूरकूटे , स्नेहा चौखंडे , सूशीलकूमार शिंदे , श्रद्धा मोचेमाडकर , महेंद्र कदम , विजय तावडे , निवेदीता कोचरेकर यांनी विशेष प्रयत्न केले.