बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण च्या वतीने महामानवाला अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव,बोधीसत्व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण,(रजी.)मुंबई. ग्रामिण या १२ गाव संघटनेच्या वतीने दि.६ डिसेंबर २०२३ रोजी खारेपाटण बुद्धविहार पंचशील नगर खारेपाटण येथे “महामानवाला अभिवादन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला विभागातील सर्व बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे सरचिटणीस सचिन को यांनी केले आहे.
खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळयाला उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.यानंतर सकाळी १०.०० ते ११.३० अभिवादन सभा त्यानंतर ११.३० ते १२.३० “अभिवादन महामानवाला” या कार्यक्रमाअंतर्गत विशेष समुहगान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक गाव मंडळाला भीम बुद्ध गिते गाण्याची संधी देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य असे आवाहन बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या ग्रामीण संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.













