आमदार नितेश राणेंकडून 30 लाखांचा निधी
माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत , संजना सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
कनेडी (प्रतिनिधी): गेली कित्येक वर्षाची मागणी असलेल्या गांधीनगर ( खलांतर )मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ जेष्ठ नागरिक अनंत काका सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला कणकवलीचे आम नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून व संदेश सावंत आणि संजना सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारच्या बजेट मधून 30 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे कामाच्या शुभारंभ वेळी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत सरपंच मंगेश बोभाटे उप सरपंच राजेंद्र सावंत ग्रा प सदस्य प्रसंना सावंत मंजुषा बोभाटे जेष्ठ नागरिक डी ऐ सावंत मारुती सावंत बाळू सावंत रमेश भाऊ सावंत अशोक सावंत हवालदार प्रमोद सुधीर सावंत विक्रांत सावंत संदीप सावंत आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.