महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन

वेंगुर्ले (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले व जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपाच्या वतीने २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत डाॅ. भिमराव आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ” संविधान गौरव पंधरवडा ” आयोजित करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना लखमराजे भोसले म्हणाले की डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे जातीभेद, लिंगभेद आणि वर्गभेद या विरुद्ध लढा देणारे समाज क्रांतिकारक आणि वंचितांच्या कल्याणाचा वसा घेतलेले राजकारणी म्हणून जगभर लौकिक आहे. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलुपैकी एक महत्वाचा पैलु म्हणजे, ते एक निष्णात अर्थतज्ञ होते . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर म्हणाल्या, मोदी सरकारने संविधान दिनानिमित्त सुप्रीम कोर्टात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कामगिरी करुन बाबासाहेबां बद्दल असलेला आदर द्विगुणित केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांना केले. यावेळी जिल्हा का. का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, नगरसेविका श्रेया मयेकर, शक्तिकेंद्र प्रमुख गणेश गावडे व निलेश मांजरेकर, ता. चिटणीस जयंत मोंडकर, युवा मोर्चाचे हेमंत गावडे – कृष्णाजी सावंत – मारुती दोडशानट्टी – तन्मय जोशी, महीला मोर्चाच्या कार्तीकी पवार व स्वरा देसाई , जेष्ठ कार्यकर्ते मनोहर होडावडेकर गुरुजी, महेश धुरी, प्रशांत धुरी, सुनील मठकर, सुरेश धुरी इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!